रत्नागिरी : चाफवली (ता. संगमेश्वर) येथे जंगलतोडीवर काम करणारी महिला पेट्रोलने चूल पेटवत असताना ७० टक्के भाजली. गंभीर जखमी महिलेला अधिक उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. द्रौपदी चंद्रकांत पवार (४२, रा. चाफवली, ता. संगमेश्वर) असे ७० टक्के भाजलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना २८ डिसेंबरला दुपारी ३ वा. च्या सुमारास चाफवली येथील जंगलमय भागात झोपडीत घडली.
द्रौपदी हि चाफवली येथील जंगलमय भागात झोपडीत रहात असून रविवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी पेट्रोलने चूल पेटवत असताना आगीचा भडका उडाला व तिच्या कपड्यांनी पेट घेतला. या आगीचा भडका एवढा भयंकर होता की, त्यामध्ये ती ७० टक्के भाजली. तिला तातडीने उपचारासाठी साखरपा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 02/Jan/2026














