Ratnagiri : भगवतीनगर येथील भैरी भगवती मंदिरात आज पौष पौर्णिमा उत्सव

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील श्री देवी भैरी भगवती मंदिरात २ जानेवारी रोजी श्री देवी भैरी भगवती मातेचा पौष पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त श्री देवी भैरी भगवती मातेच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता देवीची विधीवत पूजा, देवीला रूपे लावणे, रात्री सात वाजता दीपोत्सव, देवीच्या भोवत्या, साडेसात वाजता गोंधळ आणि रात्री दहा वाजता कोकणचा साज संगमेश्वरी बाज लोकनाट्य कार्यक्रम सादर होणार आहे.

या पौष पौर्णिमा उत्सवानिमित्त भगवती मातेच्या मंदिर परिसरात यात्रा उत्सव साजरा होणार आहे. या निमित्त भाविकांना विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद घेता येणार आहे. दरवर्षी हा पौष पौर्णिमा उत्सव परिसरातील भक्तगणांसाठी खास आकर्षण ठरतो. या उत्सवासाठी श्री देवी भैरी भगवती सार्वजनिक उत्सव समितीकडून जय्यत तयारी केली असून भाविकांना उत्सवाचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी प्रमुख पदाधिकारी व सदस्य सज्ज झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 02/Jan/2026