राजापूर : नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत सुरु असलेल्या कोदवली नवीन धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी धरणाच्या प्रगतिपथावरील विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला.
पाहणीदरम्यान धरणाच्या कामात उर्वरित राहिलेल्या १७ गेटचे काम, एम-३० काँक्रीटचे काम, सीपीसीसी ट्रीटमेंट, पाईपलाईन टाकण्याचे काम, धरणावर जाण्यासाठी काँक्रीट पोहोच रस्ता, विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी करण्यात आली. संबंधित कामांची गुणवत्ता, गती आणि वेळेत पूर्तता होण्याबाबत नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना आवश्यक सूचना दिल्या.
कोदवली धरण पूर्ण झाल्यानंतर धरणातील पाण्याची साठवण सुरू झाल्यानंतर राजापूर शहराला पाण्याची टंचाई कायमची दूर होणार असल्याची ग्वाही नगराध्यक्षा खलिफे यांनी दिली. यावेळी नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, स्वप्निल पड्यार, दिवाकर खडपे, कंत्राटदार गदगू जाधव उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 02/Jan/2026














