चिपळूण नगर परिषदेची जीर्ण इमारत पाडण्यास सुरुवात

रत्नागिरी : चिपळूण नगर परिषदेची जीर्ण झालेली इमारत पाडण्याच्या कामाचा नववर्षारंभदिनी प्रारंभ झाला. त्या ठिकाणी आधुनिक व सुसज्ज नवी इमारत उभारली जाणार आहे.यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, मुख्याधिकारी विशाल भोसले, तसेच सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

नवीन इमारत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी नगराध्यक्ष म्हणून उमेश सकपाळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. उर्वरित निधीही लवकरच प्राप्त होणार असून, त्यानंतर संपूर्ण क्षमतेने बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जुन्या इमारतीचे पाडकाम सुरू करण्यात आले असून लवकरच चिपळूण शहराला आधुनिक, प्रशस्त व नागरिकाभिमुख अशी नवी नगर परिषद इमारत मिळणार आहे.यावेळी उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, शिवसेना शहराध्यक्ष प्राजक्ता टकले, सर्व नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 02-01-2026