दापोली : दापोली नगरपंचायत क्षेत्रातील काळकाई कोंड परिसरातील डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नसल्याने, मोकाट गुरे मोठ्या प्रमाणात कचरा आणि त्यासोबत असलेले प्लास्टिक खात आहेत. ही बाब जनावरांच्या आरोग्यासाठी घातक असून यामुळे मुक्या प्राण्यांचा मृत्यू ओढवू शकतो.
कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक बाटल्या इतर घातक साहित्य उघड्यावर टाकले जात आहे. खाद्याच्या शोधात आलेले ही जनावरे प्लास्टिक पिशव्यांच्या मधून खाद्य शोधताना प्लास्टिक पिशव्यांसहित हे खाद्य खात आहेत त्यामुळे त्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम घडून येत आहे.
जनावराने प्लास्टिक खाल्ल्यामुळे जनावराच्या पचनसंस्थेत अडथळे निर्माण होतात ज्यामुळे प्रसंगी त्यांचा तडफडून मृत्यू होऊ शकतो. जर ही गुरे दूध देणारी असतील, आणि दुर्दैवाने या गुरांचे दूध काढून कोणी दूध विक्री करत असेल तर प्लास्टिक मधील विषारी घटक मानवी साखळीत शिरगाव करू शकतात. डम्पिंग ग्राउंड ला तत्काळ संरक्षण जाळी किंवा कुंपण घालावे.
कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करून, प्लास्टिक सह इतर कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करावे. परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा जेणेकरून जनावरे तिथे जाणार नाहीत. आदी उपाययोजना करुन मुक्या जनावरांच्या जिविताशी होणारा खेळ थांबवावा आणि निसर्गसंवर्धनही केले जावे. तरी या गंभीर विषयाकडे दापोली नगरपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरीत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 02/Jan/2026














