लांजा शहराच्या विकासाचे स्वप्न सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण करूया : नगराध्यक्षा सावली कुरूप

लांजा : नव्याने निवडून आलेल्या सर्व नगरसेवक नगरसेविकांनी आपापसामध्ये कोणतेही मतभेद न ठेवता लांजा शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न एकत्रितपणे साकार करूया, असे प्रतिपादन लांजा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सावली सुनील कुरूप यांनी लांजा येथे आज पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी केले.

लांजा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या महायुतीच्या सावली सुनील कुरूप यांचा पदग्रहण सोहळा आज गुरुवारी २ जानेवारी रोजी सकाळी मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावरून बोलताना नगराध्यक्ष सावली कुरूप या बोलत होत्या. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत, महायुतीचे प्रचार प्रमुख प्रसन्न शेट्ये त्याचप्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, महंम्मद रखांगी, लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, तहसीलदार प्रियांका ढोले, उद्योजक विकास शेट्ये, लांजाचे मानकरी कमलाकर गांधी, नाना शेट्ये, विठोबा लांजेकर, गफार मुजावर, प्रमोद आग्रे, मनोहर दिवाळे, शिवाजी कोत्रे तसेच राजन देसाई, जयवंत शेट्ये, लांजा तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, राजू धावणे, प्रसाद भाईशेट्ये, माजी नगराध्यक्षा सौ संपदा वाधधरे, माजी नगरसेविका प्रणिता बोडस, हेमंत शेट्ये, मयूर शेडे, भाजपा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, माजी नगराध्यक्ष सुनील कुरुप, व्यापारी श्री. बेंडखळे आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे नव्याने निवडून आलेले नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा सावली कुरूप यांनी सर्व लांजावासीयांचे तसेच महायुतीचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. पुढील काळात आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा शहरातील असलेल्या विविध समस्या सोडवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच निवडणूक प्रचारादरम्यान लांजावासीयांना दिलेली आश्वासने देखील पूर्ण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू असे देखील त्यांनी आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवनिर्वाचित नगराध्यक्ष सावली कुरूप तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उद्योजक अण्णा सामंत यांचा पुष्पगुच्छ देऊन यशोचित असा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थित अन्य मान्यवरांचा देखील यावेळी स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी नगरसेवक सचिन डोंगरकर यांनी केले. यानंतर महंम्मद रखांगी, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, राजन देसाई, उद्योजक अण्णा सामंत यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला लांजातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, लांजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 02/Jan/2026