संगमेश्वरमध्ये टेंपो-दुचाकीचा अपघात

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे गोव्याच्या दिशेने जाणारा टेंपो आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकी टेंपोच्या पुढील भागात जाऊन घुसली. मात्र, दुचाकीचालक हशमत अली अहमद कापडी (वय ७९) यांनी पुढील गांभीर्य ओळखून गाडी सोडून रस्त्याच्या बाजूला उडी मारली. जो त्यामुळे ते बचावले.

गोव्याच्या दिशेहून येणारा टेम्पो निझाम अहमद सफीउल्ला खान (उत्तर प्रदेश) हा चालवत होता. कसबा येथील हशमत अली अहमद कापडी हे दुचाकीने संगमेश्वरला जात होते. संगमेश्वर बसस्थानकाजवलील सॉ मिलसमोर हा अपघात झाला. संगमेश्वर पोलिस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, हेड कॉन्सटेबल सचिन कामेरकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून महामार्गावर दोन्ही बाजूला खोळंबलेल्या वाहनांसाठी मार्ग खुला करून दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 28/Oct/2024