Khed : नैराश्यातून ५० वर्षीय प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

खेड : कोणताही कामधंदा नसल्याच्या नैराश्यातून एका ५० वर्षीय प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील भेलसई-महाडिकवाडी येथे ३१ डिसेंबर रोजी घडली. सतीश सदाशिव महाडिक असे त्यांचे नाव आहे. त्यांना दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेतच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत खेड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 02/Jan/2026