देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील जिल्हा परिषद आदर्श पद्मा कन्या शाळा साखरपा या शाळेने नासा इस्रो नभा चाचणी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेसाठी इयत्ता योगेश चव्हाण ही विद्यार्थिनी तालुक्यात प्रथम आली आहे. पाचवी ते सातवी पर्यंतच्या ९६ विद्यार्थिनी परीक्षेत बसल्या होत्या, त्यातून १३विद्यार्थिनींची निवड झाली. यामध्ये तालुक्यातून दोनशे विद्यार्थ्यांची निवड केली जाते त्यात तेरा विद्यार्थिनींची निवड झाल्याने त्यांच्यावर कौतुकाची थाप शिक्षक वर्गाने दिली असून या विद्यार्थिनी उद्या तालुक्यात होणाऱ्या नासा परीक्षेसाठी सज्ज झाल्या आहेत.
या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका नीलम शेडे यांनी कठोर मेहनत घेऊन शाळेच्या यशाचा आलेख उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहे. विद्यार्थिनी, शाळा व मार्गदर्शक शिक्षक वृंद यांचे केंद्र प्रमुख दिव्या भाटकर, शाळा व्यवस्थापन कमिटी, मुख्याध्यापिका चारुता खानविलकर व सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 02/Jan/2026














