Chaitra Navratri : 2026 वर्षात चैत्र नवरात्र कधी आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Chaitra Navratri 2026: 2026 नववर्षाला नुकतीच सुरूवात झाली आहे. अशात देवीभक्तांना आतुरता असते ती म्हणजे चैत्र नवरात्रौत्सवाची…चैत्र नवरात्र हा दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा सण आहे. हा सण चैत्र महिन्यात साजरा केला जातो आणि राम नवमीने संपतो. या वर्षी चैत्र नवरात्रीचा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे? त्याचे महत्त्व, सर्वकाही जाणून घेऊया.

देवी दुर्गेला समर्पित नऊ दिवसांचा सण
चैत्र नवरात्र, ज्याला वसंत नवरात्र असेही म्हणतात, हा देवी दु्र्गेला समर्पित नऊ दिवसांचा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा सण चैत्र महिन्यात साजरा केला जातो, जो सहसा मार्च किंवा एप्रिलमध्ये येतो. या सणादरम्यान दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि राम नवमीने संपतो. चैत्र नवरात्र उत्सव वसंत ऋतूचे आगमन, नवे ऋतू आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करते. 2026 मध्ये चैत्र नवरात्र कधी आहे, त्याचे महत्त्व आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे?

चैत्र नवरात्र 2026 मध्ये कधी आहे?
वैदिक पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी येते. या दिवशी प्रतिपदा तिथी सकाळी 06:52 वाजता सुरू होते, म्हणून चैत्र नवरात्र देखील याच दिवशी सुरू होईल. 27 मार्च 2026 रोजी संपेल. भगवान रामाचा जन्मदिवस म्हणजेच, रामनवमीच्या दिवशी साजरा केला जाईल. अशा प्रकारे, चैत्र नवरात्री 19 मार्च ते 27 मार्च 2026 पर्यंत चालेल आणि 28 मार्च रोजी दशमी पूजेने सांगता होईल.

चैत्र नवरात्र 2026 घटस्थापना मुहूर्त
धार्मिक मान्यतेनुसार, घटस्थापना ही नवरात्रातील मुख्य विधींपैकी एक आहे आणि या उत्सवाची सुरुवात आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी किंवा ठरलेल्या वेळी घटस्थापना करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रांमध्ये सांगितले आहे. या वर्षी चैत्र घटस्थापना गुरुवार, 19 मार्च 2026 रोजी येईल. घटस्थापनेचा मुख्य शुभ मुहूर्त सकाळी 06:52 ते सकाळी 07:43 पर्यंत असेल, जो 50 मिनिटे चालेल. याव्यतिरिक्त, हा शुभ विधी अभिजित मुहूर्ताच्या दरम्यान देखील केला जाऊ शकतो, जो दुपारी 12:05 ते 12:53 पर्यंत, 48 मिनिटे आहे.

चैत्र नवरात्री 2026 पूजा
19 मार्च 2026 (गुरुवार): घटस्थापना, शैलपुत्री पूजा – नवरात्रीचा पहिला दिवस.
20 मार्च 2026 (शुक्रवार): ब्रह्मचारिणी पूजा
21 मार्च 2026 (शनिवार): चंद्रघंटा पूजा.
22 मार्च 2026 (रविवार): कुष्मांडा पूजा
23 मार्च 2026 (सोमवार): स्कंदमाता पूजा
24 मार्च 2026 (मंगळवार): कात्यायनी पूजा
25 मार्च 2026 (बुधवार): कालरात्री पूजा (महा सप्तमी).
26 मार्च 2026 (गुरुवार): महागौरी पूजा (दुर्गा अष्टमी).
27 मार्च 2026 (शुक्रवार): नवमी (रामनवमी) – नवरात्रीची सांगता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:48 PM 02/Jan/2026