Dapoli : साखळोली मार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडी श्रमदानातून हटविली

दापोली : दापोली तालुक्यात साखळोली मार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याबाबत संबंधित खात्याने कोणतीही कार्यवाही न केल्याने अखेर ग्रामस्थांनीच श्रमदानातून रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडी तोडण्यात आली आहे. दरम्यान, या मार्गाच्या दुतर्फा झाडी वाढल्यामुळे समोरून येणारे वाहन दिसण्यास अडथळा निर्माण झाला होता. अपघातांचा संभाव्य धोका ओळखून साखळोली नं. १ येथील महिला व ग्रामस्थांनी समाजहिताच्या दृष्टीने पुढाकार घेतला. मारुती मंदिर ते मेडिकल कॉलेज, आपटी पूल या सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या मार्गावर श्रमदानातून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी हटवण्यात आली. झाडीमुळे वळणांवर समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेत झाडी हटविली.

संबंधित खात्याच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना श्रमदान काम करावे लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली. भविष्यात अशा धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाने वेळेत उपाययोजना अशी कराव्यात, मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 03/Jan/2026