खेड : शहरातील द. ग. तटकरे सभागृहात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य गणेश मोरे यांच्यासह खेड, भडगाव, लोटे, आवाशी व खाडीपट्टा परिसरातील विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढण्याची ठाम भूमिका घेणार आहे. एनडीएमधील सहभाग हा केवळ विकासकामांच्या दृष्टीने असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे तब्बल १,१०५ उमेदवार निवडून आले असून हा पक्षाच्या ताकदीचा पुरावा आहे, असेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी, गुहागर, दापोली मतदार संघात कार्यकर्त्यांनी २५ वर्षांचा राजकीय गड मोडीत काढला होता. कार्यकर्त्यांत स्वबळावर इतिहास घडवण्याची क्षमता कायम असल्याचा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार शेखर निकम, संदीप राजपुरे, संजय जाधव, अजय बिरवटकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 03/Jan/2026














