पावस : गोळप येथील शेतकरी उमंग साळवी यांच्या आंबा फुलकिड नियंत्रण पथदर्शी प्रकल्पांतर्गत निवडलेल्या आंबा बागेला ठाणे विभागाचे विभागीय सहसंचालक शिवाजीराव आमले यांनी भेट देऊन निरीक्षणे नोंदवली. यावेळी शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्याबरोबर फुलकिड व तुडतुडे नियंत्रणाकरिता कीटकनाशके, बायोपेस्टिसाइड तसेच उत्पन्न खर्च, खत व्यवस्थापन या विषयावर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर डॉ. संतोष वानखेडे (कीटक शास्त्रज्ञ, नारळ संशोधन केंद्र भाट्ये) यांनी क्रायसोपा या मित्र किडीवर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी त्यांच्या लॅबमध्ये तयार केलेले प्रौढ क्रायसोपा व त्याची अंडी बागेमध्ये सोडण्यात आली. यावेळी शिवकुमार सदाफुले (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी), विजय बेतिवार (प्रकल्प संचालक आत्मा), फिरोज शेख (उपविभागीय कृषी अधिकारी रत्नागिरी), शेतकरी उमंग साळवी, उपेंद्र जोशी, गिरीश जोशी, विकास मेढे (मंडळ कृषी अधिकारी रत्नागिरी), सागर मासाळ (मंडळ कृषी अधिकारी पावस), प्रदीप भुवड (मंडळ कृषी अधिकारी मालगुंड), घनश्याम कोकणी (उपकृषी अधिकारी), ज्ञानेश्वर राऊत (सहाय्यक कृषी अधिकारी), दीपाली साळुंके (कृषी सेवक गोळप) उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 03/Jan/2026














