चिपळूण खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात भात विक्रीची नोंदणी ३१ जानेवारीपर्यंत

चिपळूण : चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्यावतीने खरीप हंगामासाठी शासकीय आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते २ रोजी सकाळी झाले. यावेळी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन दिलीप माटे, उपाध्यक्ष अजित कोकाटे, ज्येष्ठ संचालक अशोक कदम, पांडुरंग माळी, कृष्णा खांबे आदी उपस्थित होते. यावेळी भाताला प्रतिक्विंटल २ हजार ३६९ रूपये दर शासनाने घोषीत केला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक फेऱ्याची नोंद केली आहे त्यांनी चिपळूण खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात येऊन भात विक्रीची नोंदणी करावी. त्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अंतीम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये नोंदणी करून जास्त शेतकऱ्यांनी जास्तीत भातशेतीकडे वळावे यासाठी चिपळूण खरेदी-विक्री संघ प्रयत्न करीत आहे. गेल्यावर्षी चिपळूण खरेदी-विक्री संघाने २३१०७ क्विंटल भात खरेदी केले होते.

यावर्षी त्याहीपेक्षा जास्त भात खरेदी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी म्हेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी शिंदे यांचे सहकार्य लाभत आहे. चिपळूण खरेदी-विक्री संघाने भात खरेदीची सुविधा उपलब्ध केल्याबद्दल आ. शेखर निकम यांनी कौतुक केले. यावेळी खरेदी-विक्री संघाचे संचालक विजय शिर्के, नंदकिशोर शिर्के, कृष्णा काळबे, दिनेश माटे, रघुनाथ सावंत, अनिल चिले, रमेश राणे, विलास चिपळूणकर, विकास घाग, कमलेश साळवी, स्मिता चव्हाण, माधुरी गोखले, प्रिया विचारले, व्यवस्थापक पांडुरंग कामळे, शेतकरी संजय मोरे, सुलभा मोरे, दत्ताराम शिंदे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 03/Jan/2026