Ratnagiri : जिल्हास्तरीय चाचा नेहरु बालमहोत्सवाचे ६ जानेवारीला उद्घाटन

रत्नागिरी : बालकांसाठी जिल्हास्तरावर चाचा नेहरु बालमहोत्सवाचे ६ जानेवारी रोजी शिवाजी महाराज स्टेडियम येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी दिली.

हा बालमहोत्सव ६ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर जवळ येथे होणार आहे.जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास विभागातील शासकीय/स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी, मुलांमधील सूप्तगुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधूभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यास येते. या जिल्हास्तरीय बाल महोत्सवामध्ये जिल्ह्यातील एकूण ८ अशासकीय बालगृहातील बालके तसेच तसेच रत्नागिरी नगरपालिका शाळेमधील बालके असे एकूण ५०० बालके सहभागी होणार आहेत.

जिल्हास्तरीय बालमहोत्सवामध्ये क्रिकेट, खोखो, कबड्डी, गोळा फेक, लांब उडी, १०० मीटर धावणे, ४ x १०० मीटर रिले, कॅरम, बुद्धिबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व अशा क्रीडा स्पर्धा तसेच सामूहिक नृत्य, सामूहिक गायन, नाटीका, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गायन आदी सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 03/Jan/2026