Lanja : कोचरी-माचाळ येथे क्षयरोग व असांसार्गिक आजार तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

लांजा : तालुक्यातील शिपोशी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कोचरी व माचाळ येथे आज (२ जानेवारी) क्षयरोग व असांसर्गिक आजार तपासणी, जनजागृती तसेच मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्याला ग्रामीण भागातील नागरिकांचा या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरादरम्यान नागरिकांची क्षयरोग व असांसार्गिक आजारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण २०७नागरिकांची एक्स-रे तपासणी करण्यात आली असून ५ संशयित रुग्णांचे NAAT नमुने घेण्यात आले. डोळे तपासणीदरम्यान २२ संशयित मोतीबिंदू रुग्णांची ओळख पटवून त्यांना पुढील तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्यालय (रत्नागिरी) येथे संदर्भित करण्यात आले.

या शिबिरास अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे यांनी भेट देऊन पाहणी केली. शिबिराचे नियोजन, तपासणी प्रक्रिया व नागरिकांचा सहभाग याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत शिबिरात मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागात क्षयरोगाचे वेळेत निदान, असंसर्गिक आजारांचा शोध तसेच डोळ्यांच्या आजारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशीच्या वैद्यकीय अधिकारी व टीमने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 03/Jan/2026