न्यूयॉर्क : अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अमेरिकेनं व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये मोठे हल्ले केले आहेत. व्हेनेझुएलाच्या सरकारनं नागरी भागात आणि सैन्याच्या तळांवर हल्ले केल्यामुळं अमेरिकेचा निषेध केला आहे.
या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. त्या दाव्यानुसार व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी अमेरिकेच्या ताब्यात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानुसार अमेरिकेनं व्हेनेझुएला आणि त्यांचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर हल्ला यशस्वीपणे केला आहे. निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडण्यात आलं असून त्यांना देशाबाहेर नेण्यात आलं आहे. ही कारवाई यूएस लॉ इनफोर्समेंटसोबत मिळून करण्यात आलं. पत्रकार परिषद घेत याची माहिती लवकर देऊ, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकद व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना हटवण्यासाठी व्हेनेझुएलात कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर व्हेनेझुएलात धमाक्याचे आवाज ऐकायला मिळाले. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरील दबाव वाढण्यासाठी त्यांच्यावर बंदी घातली आहे. व्हेनेझुएलाच्या आसपास ट्रम्प यांनी अमेरिकेचं सैन्य वाढवलं आहे. कॅरेबियन आणि पॅसिफिक महासागरात जहाजांवर ड्रग्ज तस्करी केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी गुरुवारी घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की अमेरिकेकडून व्हेनेझुएलात सरकार बदलण्यासाठी दबाव आणला जात आहे. अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या तेल साठ्याचा ताबा हवाय, असंही मादुरो म्हणाले होते. व्हेनेझुएलावरील दबाव वाढवण्यासाठी ऑगस्ट 2025 पासून कॅरेबियन समुद्रात मोठ्या प्रमाणात अमेरिकेचं सैन्य तैनात करण्यात आलं होतं, असं मादुरो म्हणाले होते.
अमेरिकेनं केलेल्या एअर स्ट्राईकचं व्हेनेझुएला कशा प्रकारे उत्तर देणार ते पाहावं लागेल. बलाढ्य अमेरिकेविरोधात व्हेनेझुएलाचा टिकावं लागतणार का ते पाहावं लागेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:29 03-01-2026














