खेड : तालुक्यात गेल्या आठवडाभर परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. या पावसात शेतात उभे असलेले भातपीक आडवे झाले असून, कापलेले भातपीक भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने तालुक्यात ११.८ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. अजूनही परतीच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 28/Oct/2024














