Jay Dudhane First Reaction After Arrested: ‘बिग बॉस मराठी 3’मध्ये (Bigg Boss 3) आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता जय दुधाणे (Actor Jay Dudhane) अडचणीत सापडला आहे. लग्नाच्या अकराव्या दिवशीच जय दुधाणेला झालेल्या अटकेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अभिनेता जय दुधाणेला ठाणे पोलिसांनी (Thane Police) मुंबई विमानतळावरुन (Mumbai Airport) ताब्यात घेतलं. जयवर तब्बल 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि तो देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, असाही आरोप पोलिसांकडून करण्यात आलाय. पोलीस सध्या त्याच्या कुटुंबाचीही चौकशी करत आहेत. अटक झाल्यानंतर जय दुधाणेनं प्रतिक्रिया दिली आहे. जय दुधाणे म्हणाला की, मी कुठे पळून गेलो नाही. जे आहे त्याला सामोरं जाणार. पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत. माझ्या आजी-आजोबांनाही सोडलं नाही. गाळा विकल्यावरून ही अफवा कोण पसरवत आहे, तेच समजत नाही, असं जय दुधाणे म्हणाला आहे.
ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस मराठी 3’चा रनरअप जय दुधाणेवर बनावट कागदपत्रं तयार करून एकच दुकान अनेक लोकांना विकल्याचा आरोप आहे, ज्यामुळे खरेदीदारांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या प्रकरणात जय दुधाणेसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांची – त्याचे आजोबा, आजी, आई आणि बहीण – यांचीही चौकशी केली जात आहे. ठाणे पोलिसांचं म्हणणं आहे की, तपासादरम्यान आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
अटकेनंतर जय दुधाणेनं काय प्रतिक्रिया दिली?
अटक झाल्यानंतर जय दुधाणे म्हणाला की, “वडिलांची जबाबदारी घेतली, पण लोक माझ्यावरच उलटले आहेत. सत्य लवकरच समोर येईल. मी कुठे पळून गेलो नाही. जे आहे त्याला सामोरं जाणार. पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत. माझ्या आजी-आजोबांनाही सोडलं नाही. गाळा विकल्यावरून ही अफवा कोण पसरवत आहे, तेच समजत नाही. तसं काही असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवा. हा खोटा गुन्हा आहे आणि मी माझा चेहरादेखील लपवलं नाही. सत्य लवकरच समोर येईल. माझ्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आयुष्यात अशा अनेक अडचणी आपल्यासमोर येतात, त्यांना सामोरं जाण्याची हिंमतदेखील असली पाहिजे आणि ती माझ्यात आहे…”
याविषयी तो पुढे म्हणाला, “मी माझ्या हनिमूनसाठी जात होतो. मी, माझी बायको, माझा भाऊ आणि त्याची बायको असे चौघेजण परदेशात जात होतो. माझ्या नावाचं अटक पत्र आहे हे मलाच माहिती नव्हतं. पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही देश सोडून जाऊ शकत नाही. त्यामुळे मी पोलिसांना सामोरं जाणार आहे…”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 05-01-2026














