Chiplun : भाजप बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बैठकांचा धडाका लावला असून, नुकतेच भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत माजी आमदार डॉ. विनय नातू, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहा, असे आदेश दिले.

काही दिवसांपूर्वी उमरोली, कळवंडे, वहाळ, सावर्डे, कोकरे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांचा आढावा घेतला, तर आता भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यालयात रत्नागिरी तालुक्याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी डॉ. नातू, मोरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी निवडणुकीची व्यूहरचना आखा, यश नक्कीच मिळेल, असे आश्वासित केले. यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस नीलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, ज्येष्ठ पदाधिकारी दत्ता देसाई, रत्नागिरी दक्षिण मंडळ अध्यक्ष संयोग दळवी, रत्नागिरी उत्तर मंडल अध्यक्ष प्रतीक देसाई, रत्नागिरी उत्तर मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 05/Jan/2026