Guhagar : चिखलीत भरणार जनावरांचा उपबाजार

गुहागर : गुहागर तालुक्यातील चिखली येथे पाळीव प्राणी, गुरे-ढोरे तसेच शेळ्या मेंढ्यांच्या उपबाजाराचा प्रथमच शुभारंभ होणार आहे. या उपबाजाराचा उद्घाटन सोहळा ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री व उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उबाठा नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते या उपबाजाराचे उद्घाटन होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. विनय नातू भूषवणार आहेत. या कार्यक्रमाला रत्नागिरी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपानराव शिंदे, बाजार समितीचे सभापती व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संदीप सुर्वे, गुहागर नगराध्यक्ष नीता मालप, माजी नगराध्यक्ष राजेश बैंडल, गुहागर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभणार आहे.

याचबरोबर या कार्यक्रमास अरविंद आंब्रे, सुरेश सावंत, मधुकर दळवी, सुरेश कांबळे, हेमचंद्र माने, स्नेहल बाईत, स्मिता दळवी, विजय टाकळे, नैनेश नारकर, रोहित मयेकर, ओंकार कोलते, प्रशांत शिंदे, बाजार समितीचे सचिव पांडुरंग कदम, चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी मंगेश कदम, उपसरपंच सुभाष दळवी, तसेच ग्रामपंचायत सदस्य पराग जोगळे, विजय गमरे, साक्षी साळवी, निलम गमरे, मधुरा सोलकर, निधी गांगण, मधुरा गोयथळे आदी उपस्थित राहणार आहेत.

या उपबाजारामुळे गुहागर तालुक्यातील शेतकरी व पशुपालकांना मोठा फायदा होणार असून, व्यवहार सुलभ व पारदर्शक होण्यास मदत मिळणार आहे. तरी गुहागर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे व संचालक गजानन पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 05/Jan/2026