रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता अभिषेक देवकाते ठरला. त्याने १ तास १० मिनिटे व ७ सेकंदात २१ किमीचे चढ-उतार, वळणांचे रस्ते असलेले आव्हानात्मक अंतर पार करून विक्रम केला. आधीच्या पर्वातील स्वतःचाच विक्रम त्याने मोडला.
त्याच्यापाठोपाठ अमोल आमूने व गौरव काकडे यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. महिलांच्या गटात १ तास २३ मिनीटे व २२ सेकंदात साक्षी जड्याळ यांनी अव्वल स्थान, तर श्रेया पाटील व ऐश्वर्या लोंढे यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले.
१३ राज्यांतील ३०० शहरांतून २२०० हून अधिक धावपटू सहभागी झाले. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून २१ व १० किमी स्पर्धेला सुरवात झाली, तर नगराध्यक्षा शिल्पा – सुर्वे यांच्या हस्ते ५ किमी स्पर्धेला झेंडा दाखवण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी जीवन देसाई, नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, पोलिस अधिकारी माईनकर, – शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी उपस्थित होते.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल
२१ किमी- ३६ ते ४५ वयोगट- पुरुष- सुनील शिवणे, पवन प्रजापती, मल्लिकार्जुन पारडे, महिला- योगिता पाटील, दिव्या जयराम, विद्या रवळे. ४६ ते ५५ वयोगट महिला अनिता पाटील, मानसी मराठे, शीतल बने, पुरुष – रवींद्र जगदाळे, अनंत तानकर, जयंत शिवदे. ५६ ते ६५ वयोगट-पुरुष पांडुरंग पाटील, केशव मोटे, संजय पाटील. खुला गट- महिला-साक्षी जड्याळ, श्रेया पाटील, ऐश्वर्या लोंढे. पुरुष अभिषेक देवकाते, अमोल आमूने, गौरव काकडे. २१ किमी ६६ वर्षावरील महिला लता आलिमचंदानी. पुरुष हेमंत भागवत, चंद्रकांत धुरी, प्रमोद शेट्ये. ५६ ते ६५ वयोगट महिला क्रांती साळवी, मंगलादेवी गवई.
१० किमी : ३६ ते ४५ वयोगट महिला- इंदुबाला एस. माधुरी शिवदे, मनस्वी गुडेकर, श्वेताकुमारी, पुरुषगट -रूपेश शेलार, दीपक वरपे, वसीम शेख, ४६ ते ५५ वयोगट – महिला डॉ. वैशाली गायकवाड, स्मिता अडसूळ, सुनिता अरगडे, पुरुषगट- विठ्ठल अरगडे, शिवाजी पाटील, आतिश खोत, ५६ ते ६५ वयोगट – महिला-संगीता उबाळे, सुभाषिनी श्रीकुमार, शिल्पा भन्साळी, पुरुषगट- सुनील हरिदास, अतुल बांदिवडेकर, लक्ष्मण यादव, ६६ वर्षावरील पुरुष-दयाकिशन यादव, बजरंग चव्हाण, पुरुषोत्तम गुप्ता, महिला डॉ. प्रमिला पाटील, शुभांगी देवरुखकर. खुला गट- महिला रोहिणी पाटील, खुशी हसे, मेघा सातपुते, पुरुष ओंकार बायकर, आदित्य धुळप, शिवम कोष्टी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 05/Jan/2026














