चिपळूण : भैरवगड (ता. चिपळूण) येथे फिरण्यासाठी गेलेल्या चिपळूण तालुक्यातील एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विनय दिनानाथ घाडे (४५, रा. शिवाजीनगर, खेर्डी, ता. चिपळूण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खबर देणारे प्रकाश बुध्दीवंत पाथरुड हे विनय घाडे यांचे मित्र असून ते व इतर मित्र दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता भैरवगड येथे फिरण्यासाठी गेले होते. रात्री तेथे मुक्काम केल्यानंतर दिनांक २२ डिसेंबर रोजी मंदिरासमोर उन्हात उभे असताना विनय घाडे यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर मित्रांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, हेळवाक येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, पाटण येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मित्रांनी पाटण येथे दाखल केले असता, दुपारी ३.१५ वाजता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:50 PM 05/Jan/2026














