दापोलीतील १० विद्यार्थी इस्रो-नासा अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हास्तरासाठी पात्र

दापोली : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या इस्रो-नासा अभ्यास दौरा या महत्त्वाकांक्षी उपक्रमात दापोली तालुक्यातील २०४ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरासाठी पात्रता मिळवली आहे. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी २ जानेवारी रोजी तालुकास्तरीय चाळणी परीक्षा घेण्यात आली होती.

तालुकास्तर चाळणी परीक्षेचा निकाल जाहीर करताना गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, नोडल अधिकारी बळीराम राठोड तसेच विस्तार अधिकारी नजीर वलेले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जिल्हास्तर चाळणी परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये चंद्रनगर शाळेच्या आरोही मुलुख व नीरजा वेदक, हर्णे नं. १ शाळेच्या आध्या कदम व सृष्टी कोठावळे, गावरई येथील परी प्रजापती, नवशी शाळेच्या प्रांजल खळे, विरसई येथील अक्षरा पाटील तसेच देहेण शाळेतील सुष्टी साळवी यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 05/Jan/2026