चिपळूण : कोकणातील आणि राज्यातील ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना चिपळूणमधील एका कार्यक्रमादरम्यान अचानक भोवळ आल्याची (Felt Dizzy) घटना समोर आली आहे. चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या (Krishi Mahotsav) कार्यक्रमासाठी ते आले होते. भाषण संपवून आपल्या जागेवर परतत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि भोवळ आली. सुदैवाने सुरक्षा रक्षकांनी वेळीच त्यांना आधार दिल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
नेमकी घटना काय घडली?
चिपळूणमध्ये आयोजित कृषी महोत्सवात नारायण राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या आक्रमक शैलीत आणि उस्फूर्तपणे भाषण केले. बराच वेळ त्यांचे भाषण सुरू होते. भाषण संपवून ते व्यासपीठावर आपल्या खुर्चीकडे (जागेवर) बसण्यासाठी जात असतानाच त्यांना अचानक भोवळ आली.
क्षणार्धात ही बाब त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या (Security Guards) लक्षात आली. त्यांनी तातडीने राणे यांना सावरले आणि खुर्चीवर बसवले. कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना लगेचच पाणी दिले आणि प्राथमिक उपचार करण्यात आले. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर राणे यांना त्यांच्या रक्षकांनी सुखरूप कार्यक्रम स्थळावरून बाहेर नेले.
वाढत्या उन्हाचा फटका?
सध्या वातावरणात मोठा बदल झाला असून उन्हाचा तडाखा वाढला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी उष्णता (Heat) मोठ्या प्रमाणात होती. त्यातच नारायण राणे यांचे भाषण दीर्घकाळ चालले. वाढते वय आणि उन्हाचा तडाखा यामुळे त्यांना डिहायड्रेशन किंवा थकवा जाणवून भोवळ आली असावी, अशी प्राथमिक मिळत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर (Stable) आहे.
निवृत्तीचे संकेत आणि दौऱ्यांचा ताण
विशेष म्हणजे, नुकत्याच एका कार्यक्रमात नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. आपले दोन्ही पुत्र (निलेश आणि नितेश राणे) आता समर्थपणे काम करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. सध्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे, सभा आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. या धावपळीचा परिणाम नेत्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे भरगच्च दौऱ्यांमध्ये नेत्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:47 05-01-2026














