पावस : पावस बाजारपेठ मार्गावरती सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला असून, त्यामुळे दरवर्षी करावा लागणारा खड्ड्यांचा सामना यावर्षीपासून दूर होणार असल्याने वाहनचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पावस बाजारपेठ मार्ग अरुंद व गटारांचा अभाव असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्ग काढण्यात आला; परंतु बाजारपेठ मार्गावरील खड्ड्यांची समस्या दरवर्षी वाढतच गेले अनेक वेळा रस्त्याचे चांगल्या तहेचे डांबरीकरण करण्यात आले; परंतु अरुंद रस्ता व रस्त्याच्या दुतर्फा गठारे नसल्यामुळे दरवर्षी रस्त्यावरती खड्ड्यांचे प्रमाण वाढलेले होते.
त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार उदय सामंत यांनी आश्वासन दिले होते की, संपूर्ण बाजारपेठ मार्गावरील रस्ता सिमेंट काँक्रीटच्या करू, त्याप्रमाणे महिन्यापूर्वी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 05/Jan/2026














