लांजा : लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक ७ जानेवारी रोजी भव्य नमन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस बुधवारी ७ जानेवारी रोजी लांजा तालुका शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमाचे निमित्ताने बुधवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता शिवसेना संपर्क कार्यालय लांजा समोर नमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत खालील नमन मंडळे सहभागी झाली आहेत. आई भराडीन देवी नाट्य नमन मंडळ सडवली, महाकाली नमन मंडळ कुंभारवाडी कोलधे, श्री मठबाबा नमन मंडळ, मठवाडी, रुण, लक्ष्मीकांत नमन मंडळ, जोशीगाव- आगवे, नवयुवक नमक मंडळ, मांडवकरवाडी, आगवे, उत्तर विभाग कलामंच नमन मंडळ, कुवे, भव्य दिव्य मंचावरील या नमन स्पर्धेचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन लांजा तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 05/Jan/2026














