रत्नागिरी : टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी गोवा क्षेत्रातील पोस्टमास्तर जनरल यांच्या वतीने पोस्टल पेन्शन अदालत २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती डाकघर अधीक्षकांनी दिली.
निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे आणि गोवा राज्यांचे निवृत्तीवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी ज्यांचा ३ महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही, अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल.
पेन्शन अदालतमध्ये कायदेशीर प्रकारणे (CAT/Court Cases), नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इ. आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतनधारक आपले अर्ज महेश एन, लेखा अधिकारी / सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांचे कार्यालय, पणजी यांच्या नावे १५ जानेवारी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात. ई मेल आयडी accts.goa@indiapost.gov.in. आहे. १५ जानेवारीनंतर मिळालेल्या अर्जावर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 05/Jan/2026














