दापोली : कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाची 1999 साली स्थापना करण्यात आली. हे महाविद्यालय स्थापनेत कै. ए. जी. पोवार सहीत अनेकांचे योगदान आहेत. या महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृह असे करण्यासाठी आधीचे नाव बदलून डॉ. ए. जी. पोवार सांस्कृतिक सभागृह असे नामांतरण करण्यासाठी या महाविद्यालयाकडुन पाठपुरावा करण्यात आला असुन मा. कुलगुरू महोदय डॉ. संजय भावे यांच्या पुढाकाराने विद्यापीठ कार्यकारी परिषदेने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या महाविद्यालय स्थापनेत मोलाचा वाटा असलेले डॉ. ए.जी. पोवार यांचे नांव सांस्कृतिक सभागृहाला डॉ. ए.जी. पोवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. १५३/८ दि. ९.१०.२०२५ नुसार झालेल्या कार्यकारी परिषदेत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
अखेर कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहाचे नामांतरण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत 31 डिसेंबर 2025 रोजी नामांतरणाचा सोहळा पार पडला. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली आणि माजी विद्यार्थी संघटना, कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी शिक्षण संचालक डॉ. सतिष नारखेडे, कुलसचिव. डॉ. संतोष सावर्डेकर, नियंत्रक श्री. अंबपकर, डॉ. राजेश ठोकळ, माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक निर्बाण, डॉ. प्रमोद सांवत, या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अतुल मोहोड यांच्या उपस्थित पार पडला. यापुढे कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहाला डॉ. ए. जी. पोवार सांस्कृतिक सभागृह या नावाने ओळखले जाईल.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. संजय भावे यांनी डॉ. अशोक गणपत पोवार हे दापोली येथील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाशी संबंधित एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते, ज्यांना डॉ. ए.जी. पोवार’ म्हणून ओळखले जाते आणि ते महाविद्यालयाच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग होते. दापोलीच्या कृषी विद्यापीठाशी संबंधित होते, जेथे त्यांनी कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. संपूर्ण कोकणामधुन कृषि अभियांत्रिकी मधुन पदवी धारण करणारे पहिले अशी त्यांची ओळख होती. कै. पोवार यांचेसोबत काम करणे इतके सोपे नव्हते. कामाचा दांडगा अनुभव, अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. एकदा हातात घेतलेले काम पुरे करुनच शांत बसत असत. डॉ. भावे यांनी कै. डॉ. अशोक पोवार यांचे किस्से सांगितले.
परंतु त्यामधील महत्त्वाचा किस्सा सांगताना म्हटले की, डॉ. ए.जी. पोवार हे एस.टी. महामंडळाच्या गाडीने दापोलीहुन थेट नागपूर येथे जावुन कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे आणण्यासाठी अधिवेशात प्रस्ताव सादर करण्यासाठी गेले होते. या करीता तब्बल 8 दिवस त्यांनी नागपुर मध्ये मुक्काम करीत आमदार, खासदार यांच्यासहित त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सर्व प्रस्तावाच्या बाबी समजावुन सांगत थेट या अधिवेशनात या महाविद्यालयाची घोषणा करण्यात आल्यावरच त्यांनी दापोलीचा परतीचा प्रवास केल्याचा प्रसंग सांगितला. त्यांच्या स्वभाव अतिशय शिस्तप्रिय असला तरी त्यामध्ये ओलावा होता. त्यांनी या महाविद्यालयाला पाटी-पेन्सील हा महाविद्यालयात नवा प्रयोग करीत अनेक विद्यार्थी घडवले व आज हे विद्यार्थी मोठ्या पदांवर काम करीत असल्याचे डॉ. भावे यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमाला डॉ. बी. एल. आयरे, डॉ. किशोर धांदे, डॉ. संदिप जैन, डॉ. प्रविण इंगळे, डॉ. अभिमान सावंत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सहयोगी अधिष्ठाता डॉ. अतुल मोहोड यांनी डॉ. ए.जी. पोवार यांचा जीवनपट सांगितला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पुनम चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. ऋतुजा पालटे यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 05/Jan/2026














