रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई ते कुरतडे जाणाऱ्या रस्त्यावर पत्र्याच्या शेडच्या आडोशाला विनापरवाना दारु विक्री करणाऱ्या संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र धर्मू शिंदे (वय ५८, रा. डोंगरवाडी, चांदेराई, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २६) सकाळी साडेअकराच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाई संशयिताकडे साहित्यासह ५१० रुपयांची विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल सागर साळवी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिस संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 28-10-2024














