रत्नागिरी : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित बालकांसाठी जिल्हास्तरावर चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एम. अंबाळकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती एस.एस. पिंगळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, प्रथम न्यायदंडाधिकारी तथा प्रधान न्यायदंडाधिकारी बाल न्याय मंडळ श्रीमती ए.डी. गाडे, मुख्याधिकारी वैभव गारवे आदी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 06/Jan/2026














