Chiplun : गहाळ ४४ मोबाईल पोलिसांनी दिले मूळ मालकांना परत

चिपळूण : प्रवासात असणाऱ्या लोकांचे गहाळ होणारे मोबाईल पोलिस तपासात सापडलेले तब्बल ४४ मोबाईल संबंधित लोकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या हस्ते मूळ मालकांना या मोबाईलचे वितरण करण्यात आले.

अनेकवेळा एसटी रेल्वे प्रवासात याशिवाय अन्यत्र मोबाईल गहाळ होत असतात. त्याची चोरी देखील होत असते. या मोबाईलचा शोध घेण्यासाठी नागरिकांकडून पोलिस ठाण्यात अर्ज केले जातात. त्यानुसार या मोबाईलचा शोध घेतला जातो व पोलिसांत नोंद ठेवली जाते. असे तपासात मिळालेले तब्बल ४४ मोबाईल संबंधित मालकांना परत देण्यात आले.

जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधीक्षक महामूनी, चिपळूण डीवायएसपी प्रकाश वेले, पोलिस निरीक्षक मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष शिंदे, वर्षा रहाटे यांनी गहाळ मोबाईलचा शोध घेतला आणि ५८ मोबाईल शोधण्यात यश आले. त्यातील ४४ मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. चिपळूण पोलिस ठाण्यात मोबाइलचे वितरण करण्यात आले. यावेळी मोबाईलचे मूळ मालक उपस्थित होते. पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 06/Jan/2026