गुहागर : तळवली सुकाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांच्याहस्ते सोमवारी करण्यात आले. खासदार सुनील तटकरे यांच्या यांच्या विशेषतः प्रयत्नातून या रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी निधी मंजूर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सेक्रेटरी संतोष जोशी यांच्या पुढाकाराने या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून या रस्त्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. निवडणूक काळात दिलेल्या विकासकामांचे आश्वासन पूर्ण झाल्याने येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी गुहागर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, सरचिटणीस संतोष जोशी, जिल्हासरचिटणीस श्रीधर बागकर, दीपक शिरधनकर, राष्ट्रवादी तळवली गाव प्रमुख रमेश जोशी, नगरसेवक सौरभ भागडे, ग्रामपंचायत सदस्या मानसी पोफळे, दत्तकुमार शिगवण, चिंचवाडी अध्यक्ष प्रकाश सांगळे, भेळेवाडी अध्यक्ष स्वप्निल शिगवण, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांनी यावेळी सांगितले की, आपण पक्षाच्या माध्यमातून विकास कामांसाठी प्राधान्य देणार असून केवळ निवडणुकांपुरते विकास कामांचे आश्वासन देणार नाही या भागातून सुनील तटकरे यांना चांगले मताधिक्य मिळाले असून यापुढे देखील कायम आम्ही विकास कामे करत राहणार आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 06/Jan/2026














