रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज कामगारांची कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता सेना या संघटनेने वीज कामगारांच्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा नुकत्याच रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या.
स्पर्धेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण बारा संघांना प्रवेश देण्यात आला होता. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ शिल्पा सुर्वे तसेच अॅड. महेंद्र मांडवकर, फैय्याज खतीब, सौ. स्नेहल वैशंपायन यांच्या उपस्थितीत झाला.
या वेळी कोल्हापूर येथील सहाय्यक महाव्यवस्थापक शशिकांत पाटील, रत्नागिरी सहाय्यक महाव्यवस्थापक अजय निकम, आप्पासाहेब पाटील, श्रीकृष्ण वायदंडे, समीर सिंघम हे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध ठिकाणचे अभियंता, वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष जयेंद्र थुळ आदीसह बहुसंख्य वीज कामगार हजर होते.
दोन दिवस सलग चाललेल्या स्पर्धेत सामने हे चार गटात लीग पध्दतीने खेळवण्यात आले. अंतिम सामन्याची रंजक लढत हि रत्नागिरी वॉरीयर्स व चिपळूण वॉरीयर्स ह्या संघात होऊन रत्नागिरी वॉरीयर्स ने चिपळूण वॉरीयर्स चा पराभव करुन विजेतेपदाचा चषक पटकावला.
पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. निलेश विलणकर, इंजि. कळेकर, वासावे, मोडक, घाडगे, वरक, नितीन सावंत, राहुल सुर्वे, पालकर आदींच्या उपस्थितीत पार पडला. या क्रिकेट स्पर्धेसाठी संघटनेचे सर्व सभासदांनी तसेच शहर उपविभागीय अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 06/Jan/2026














