चिपळूण : विधानसभा निवडणुकीत महायुतीत घटक पक्ष असतानाही आरपीआय पक्षाला एकही जागा सोडलेली नाही. हा पक्षावर झालेला अन्याय आहे. पक्षाचे आमदार, खासदार असेल तर विकासात्मक कामे करताना अडचणी येत नाहीत. त्यामुळेच गुहागर विधानसभा निवडणूक लढविणार आहोत, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) केंद्रीय संघटक आणि कोकणातील नेते स्व. अॅड. दयानंद मोहिते यांचे सुपुत्र संदेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गुहागर विधानसभा मतदारसंघातून मंगळवारी (ता. २९) सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आरपीआयतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी महायुतीतील मित्र पक्षांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, प्रत्यक निवडणुकीत आरपीआय आठवले पक्षाचे महायुतीला सहकार्य असते. लोकसभेतही प्रामाणिकपणे पक्षाने काम केले. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, अशी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यांना केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्रिपद दिले गेले. या मतदार संघातून वडील स्व. अॅड. दयानंद मोहिते यांनी निवडणूक लढविली होती.
त्यावेळी डॉ. विनय नातू असे यांच्यासमोर त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर सातत्याने या भागात काम करित आहोत. या वेळी महाराष्ट्र येथ प्रदेश सदस्य संदीप मोहिते, तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते, उमेश सकपाळ, विद्याधर गमरे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 28/Oct/2024














