Khed : इंटरनॅशनल ऑलिंपियाड परीक्षेत ज्ञानदीप स्कूलचे यश

खेड : मोरवंडे-बोरज ज्ञानदीप इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन आयोजित इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड परीक्षेत यश मिळविले. या परीक्षेत इयत्ता पहिलीतून ब्लेसी कोळी, स्मृती मुढे, स्पृहा मोहिते, दुसरीतील आराध्या भाटकर, आलिशा ठसाळे, साई कदम, तिसरीतील रिशा चिनकटे, रुही गांधी, नभा निकम, चौथीमधील धनश्री लवंद, आराध्य खेराडे, अद्वैत तळेकर, पाचवीतील काव्या यादव, पृथ्वी पाटील, शर्विल पाटील, तनीष तटकरे, सहावीतील मनस्वी आंब्रे, श्रद्धा कासूकर, क्षितिज काते, सातवीतील समर्थ शिरगावकर, भार्गव कदम, निनाद मासाळ, आयान भाक्षे, आठवीतील अर्चित पाटील, इ. नववीतील रुद्र मोरे, एकांश दळवी, वेदश्री थरवळ यांना शालेय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त झाले.

तसेच नभा निकम, अद्वैत तळेकर, पृथ्वी पाटील, श्रीतेज काते, समर्थ शिरगावकर, भार्गव कदम, एकांश दळवी यांची द्वितीय स्तरासाठी निवड झाली. प्राचार्य भरत मोरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 07/Jan/2026