साडवली : देवरुखनजीकच्या साडवली ग्रामपंचायतीच्या वतीने साडवली परिसरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले व्यक्त केले आहे. आहेत. याबाबत नागरिकांनी समाधान साडवली परिसरात गत दोन महिन्यात घरफोडीचे प्रकार घडले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन साडवली ग्रामपंचायतीच्या वतीने सह्याद्रीनगर तिठा, साडवली स्टॉप, ठाकरे हायस्कूल स्टॉप अशा तीन ठिकाणी तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन साडवली परिसरातील चार प्राथमिक शाळांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीची साडवली परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी करडी नजर असणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 08/Jan/2026














