खेड : कानीना-हरियाणा येथे झालेल्या केंद्रीय परीक्षा मंडळ अंतर्गत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे – बोरजमधील वेदिका सकपाळ या बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने कांस्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत देशातून ७०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये ४५ किलो खालील गटामध्ये वेदिकाने कांस्यपदकाला गवसणी घातली. तसेच भक्ती सुनील वायकर आणि समृद्धी नीलेश भोसले या दोघींना नेत्रदीप कामगिरी केली. या खेळासाठी क्रीडा शिक्षक आशिष देशमाने यांचे मार्गदर्शन लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 28/Oct/2024














