Lanja : प्रभानवल्ली खोरनिनको यंग स्पोर्ट्सच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

लांजा : प्रभानवल्ली खोरनिनको यंग स्पोर्ट्सच्या वतीने ४ जानेवारी रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नेत्र तपासणी, जनरल चेकअप, व रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराला प्रभानवल्ली खोरनिनकोमधील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरातून ३८ दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला लांजा-राजापूर-साखरपाचे आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांचे स्वागत प्रभानवल्ली खोरनिनको यंग स्पोर्ट्सचे अध्यक्ष रूपेश पालेकर यांनी केले. याप्रसंगी आमदार सामंत यांनी मार्गदर्शन करतानाच मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाले. तसेच भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व रत्नागिरी येथील इन्फिगोचे सर्व डॉक्टर यांचेही सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभानवल्ली खोरनिनको यंग स्पोर्ट्सचे सर्व कार्यकर्ते व सभासदांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 08/Jan/2026