Breaking : मानेंचा अर्ज भरायला बनेंची अनुपस्थिती

रत्नागिरी : शक्तीप्रदर्शन करीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. मोठे शक्तीप्रदर्शन करीत शहरातील आठवडा बाजार येथून निघालेली रॅली आता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली आहे. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि पदाधिकारी बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित आहेत. मात्र उबाठाचे इच्छुक उमेदवार उदय बने यांच्या अनुपस्थितीची चर्चा मात्र या ठिकाणी रंगू लागली आहे.

उबाठा कडून यावेळी निष्ठावंत शिवासैनिकालाच उमेदवारी मिळाली पाहिजे असा शिवसैनिकांचा आग्रह होता. मात्र अचाणपणे बीजेपीचे बाळ माने यांना पक्षात घेत मातोश्रीवरून त्यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे इच्छुक उमेदवार उदय बने नाराज असल्याचे बोलले जातंय. हि नाराजी चार दिवस होऊनही टिकून असल्याचे दिसत आहे. आज बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उदय बने हजर राहतील असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र उदय बने यांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येतंय. उदय बने यांची नाराजी दूर होते कि ते काही वेगळी भूमिका घेतायत याकडे आता लक्ष लागून राहिलंय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 28-10-2024