Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा

Budget 2026 नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेतखाली कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सनं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे.

संसदेच्या कॅलेंडरनुसार वित्त मंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2026 ला म्हणजेच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सादर करतील. अलीकडच्या काळात रविवारी अर्थसंकल्प सादर करण्याची पहिलीच वेळ आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं होईल. त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे 29 जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर केला जाईल. ज्यातून अर्थसंकल्पापूर्वी देशाच्या आर्थिक स्थिचीचं चित्र समोर मांडलं जाईल.

यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात आयोजित केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कामकाज 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत कामकाज सुरु राहील.त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामकाज 9 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान असेल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2026 ला देशाचा 88 वा अर्थसंकल्प सादर करतील. 2017 पासून 1 फेब्रुवारी रोजी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जात आह. यापूर्वी केंद्राचा अर्थसंकल्प 28 फेब्रुवारीला सादर केला जात होता. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलण्यात आली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्या सलग 9 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री ठरतील. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी त्यांच्या दोन कार्यकाळात 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. तर, दुसरीकडे पी. चिदंबरमन यांनी नऊ वेळा अर्थ संकल्प सादर केला आहे. तर, प्रणव मुखर्जी यांनी 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

निर्मला सीतारमण यांनी यापूर्वी 2025 मध्ये अर्थसंकल्प शनिवारी सादर केला होता. तर, अरुण जेटली यांनी 2015 आणि 2016 ला 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला होता. त्या दोन्ही वर्षी शनिवार होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दुसऱ्या टर्ममध्ये अर्थमंत्रिपदाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांना देण्यात आली आहे. तेव्हापासून त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ खात्याचा कारभार पूर्णवेळ देण्यात आला. नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये देखील निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 08-01-2026