Ratnagiri : मिरकरवाडा येथे अज्ञात वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथील सुभेदार नाका येथे बुधवारी दुपारी १२.०५ वा. सुमारास अज्ञात वृध्द बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. बुधवारी दुपारी मिरकरवाडा येथील नागरिकांना सुभेदार नाका येथील रस्त्याच्या सार्डड पट्टीवर एक वृध्द अंदाजे वय ६० बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसून आला.

त्यांनी यबाबत शहर पोलिसांना माहिती देताच पोलिस हेड कॉस्टेबल हातीसकर तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी बेशुध्द अवस्थेतील वृध्दाला खासगी रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 09/Jan/2026