पुणे: येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) खुशखबर आहे. ‘देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट!’ अशा प्रकारचे पोस्टर सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
येत्या १४ जानेवारीपूर्वी पात्र लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे, याबाबतचे पोस्टर सोशल मिडीयावरती शेअर केले जात आहेत.(Ladki Bahin Yojana)
तर राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आहे. तर, महायुतीतील दोन घटकपक्षांच्या उमेदवारांकडून त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून येत्या १४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा केला जात आहे. सरकारकडून मकरसंक्रातींच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला तर निवडणुकीच्या आचारसंहितेचा हा भंग नाही का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.(Ladki Bahin Yojana)
कोणी शेअर केलं आहे पोस्टर
मुंबईच्या वॉर्ड २ मधून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या सोशल मिडीयावर याबाबतची एक पोस्ट दोन दिवसांपूर्वी शेअर केली आहे, त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सण उत्साहाचा, क्षण मकर संक्रांतीचा.मकर संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी महायुती सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत, डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच ३००० रुपये, १४ जानेवारी पूर्वी सर्व पात्र भगिनींच्या खात्यात जमा होणार आहेत! सण-उत्सवाच्या काळात आर्थिक बळ देऊन बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम ‘देवाभाऊ’ आणि महायुती सरकारने केले आहे”. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर ३००० रूपये येतील, असा वादा घोसळकर यांनी प्रचारावेळी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून या योजनेचा प्रचार आक्रमकपणे केला जात आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना आतापर्यंत नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला असून, डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांच्या हप्त्यांची मात्र लाभार्थी प्रतीक्षा करत आहेत. १४ जानेवारीला मकरसंक्रांत साजरी होत असून, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या कालावधीत लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होईल, अशी चर्चा सुरू होती. अशातच भाजप नेत्या तेजस्वी घोसळकर यांनी केलेल्या दाव्यामुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 09-01-2026














