राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित कौन्सीलची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवारी १३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवडूक होणार आहे. नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभगृहात दुपारी २.३० वाजता ही सभा होणार आहे.
या सभेत उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य पदाच्या निवडणूकीची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे या काम पहाणार आहेत. उपनगराध्यक्ष या पदासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावयचे आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही १३ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ अशी आहे. त्यानंतर दुपारी १ ते १.१५ छाननी होणार असून त्यानंतर उमेदवारांच्या नावे जाहिर केली जाणार आहेत. त्यानंतर दुपारी १.३० ते १. ४५ या वेळेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मुदत रहाणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहिर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २.३० वाजता या निवडणूकीसाठी मतदान होऊन निकाल जाहिर केला जाणार आहे.
तर याच वेळी स्विकृत सदस्यपदासाठी निवड प्रक्रिया होणार आहे. प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया होणार आहे. दुपारी २.३० पर्यंत यासाठी प्रस्ताव दाखल करावयाचे असून दुपारी ३ वाजता ही प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी या स्विकृत नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची नावे जाहिर केली जाणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 09/Jan/2026














