खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वावे जांभूळवाडी मध्ये दिनांक ०६ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री २.३० च्या सुमारास वावे जांभुळवाडीत बिबट्या गावातील रहिवाशी कु. कुणाल शंकर उतेकर यांच्या घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा बिबट्या कैद झालेला दिसून आला आहे. त्यामूळे वावे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढते जंगल तसेच बिबट्याला भक्ष मिळत नसल्याने बिबट्या गावातील मानवी वस्ती मध्ये कुत्री, मांजरे, गावातील गुरे खाण्यासाठी बिबट्या गावात येत आहे. काही दिवसापूर्वी काजू फाटा ते धामणंद रस्त्यावर वाहन चालकांना बिबट्या दिसला होता.
दुचाकी वाहन चालक जीव मुठीत धरून रात्रीचा प्रवास करत आहेत. वाढलेले जंगल सोडून बिबट्या भक्ष्याच्या शोधात गावात मानवी वस्तीत येण्यास सुरवात झाली आहे त्यामुळे पंधरा गावातील नागरिकांमध्ये खूपच भीती निर्माण झाली आहे. सदरची घटना गावकऱ्यांनी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना सांगितली आहे. नागरिकांनी सर्तक राहणे गरजेचे आहे. रात्री बाहेर फिरू नये. बिबट्याचा वावर लोकवस्तीमध्ये वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. शेतकरी शेती कामाला जाण्यासाठी घाबरत आहेत. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 09/Jan/2026









