चिपळूण : चिपळूण शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी करून गुरुवारी सकाळी ग्रॅव्हिटी पाणी योजनेची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही पाणी योजना पूर्ण पाणी चिपळूणवासीयांना स्वच्छ देण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक उदय जुवळे, शिंदेसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद झगडे यांच्यासह कोळकेवाडी धरण परिसरातील चिपळुणासाठी ठेवण्यात आलेल्या टॅबची त्यांनी पाहणी केली.
यावेळी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित खाडे, श्रमगाथा असोसिएट्स आणि प्रगती कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार प्रमोद आवले, विनोद पाटकर, प्रकल्प सल्लागार अभियंता सचिन क्षीरसागर, तसेच कंपनीची तांत्रिक टीम यावेळी उपस्थित होती. यावेळी नगराध्यक्ष सकपाळ यांनी ठेकेदारांना दर्जेदार काम, उत्तम प्रतीचे पाइप व साहित्य वापरण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा, पावसाळ्यापूर्वीच ग्रॅव्हिटी योजनेतून या चिपळूणवासीयांना स्वच्छ पाणी दिले जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रकल्पातील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी जलसंपदा विभागाचे अभियंता रासनकर यांची भेट घेण्यात येणार आहे, तसेच लवकरच त्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याच्या सूचना नगराध्यक्ष सकपाळ यांनी दिल्या.
पालकमंत्र्यांशी बोलून तोडगा काढू
धरण परिसरात सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामाची पाहणी करताना पिंपळी येथील आरटीओ व वनविभागाच्या जागेमुळे काही अडचणी निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत योग्य मार्ग काढण्यासाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू, असे नगराध्यक्षांनी ठेकेदार कंपनीला सांगितले.चिपळूण : चिपळूण शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी करून गुरुवारी सकाळी ग्रॅव्हिटी पाणी योजनेची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही पाणी योजना पूर्ण पाणी चिपळूणवासीयांना स्वच्छ देण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक उदय जुवळे, शिंदेसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद झगडे यांच्यासह कोळकेवाडी धरण परिसरातील चिपळुणासाठी ठेवण्यात आलेल्या टॅबची त्यांनी पाहणी केली.
यावेळी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित खाडे, श्रमगाथा असोसिएट्स आणि प्रगती कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार प्रमोद आवले, विनोद पाटकर, प्रकल्प सल्लागार अभियंता सचिन क्षीरसागर, तसेच कंपनीची तांत्रिक टीम यावेळी उपस्थित होती. यावेळी नगराध्यक्ष सकपाळ यांनी ठेकेदारांना दर्जेदार काम, उत्तम प्रतीचे पाइप व साहित्य वापरण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा, पावसाळ्यापूर्वीच ग्रॅव्हिटी योजनेतून या चिपळूणवासीयांना स्वच्छ पाणी दिले जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रकल्पातील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी जलसंपदा विभागाचे अभियंता रासनकर यांची भेट घेण्यात येणार आहे, तसेच लवकरच त्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याच्या सूचना नगराध्यक्ष सकपाळ यांनी दिल्या.
पालकमंत्र्यांशी बोलून तोडगा काढू
धरण परिसरात सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामाची पाहणी करताना पिंपळी येथील आरटीओ व वनविभागाच्या जागेमुळे काही अडचणी निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत योग्य मार्ग काढण्यासाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू, असे नगराध्यक्षांनी ठेकेदार कंपनीला सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 09/Jan/2026