Ratnagiri : जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा १२ जानेवारीपासून

रत्नागिरी : जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५-२६ जिल्हास्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धा १२ व १३ जानेवारी रोजी डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री तथा उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. यावेळी गृह (शहरे), महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनिता शिरभाते यांनी कळविले आहे.

या उद्घाटन सोहळ्यास खा. सुनील तटकरे, खा. नारायण राणे, आ. निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, आ. किरण सामंत यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी विजय शिंदे हेही उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १३ जानेवारी रोजी डेरवण श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रीडा संकुलात सायंकाळी ४.३० वाजता अनेक मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 09/Jan/2026