MPSC EXAM : रत्नागिरीतील २ उपकेंद्रावर ११ जानेवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा

रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-क लोकसेवा संयुक्त पूर्व परीक्षा- ११ जानेवारी रोजी रत्नागिरी तालुक्यातील २ उपकेंद्रावर एक सत्रामध्ये सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. या परीक्षेस ८१० उमेदवार बसणार आहेत.

परीक्षेची बैठक व्यवस्था रत्नागिरी पटवर्धन हायस्कूल ००१००१ ते ००१३६०, फाटक हायस्कूलवर ००२००१ ते ००२४५० अशी बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

आयोगामार्फत आयोजित परीक्षेत गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली असून आयोगाकडून संबंधितावर फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:47 PM 09/Jan/2026