रत्नागिरी जिल्ह्याचा शूटिंग बॉलचा संघ माळशिरसला रवाना

सावर्डे : रत्नागिरी जिल्ह्याचा शूटिंग बॉलचा संघ गुरुवारी (ता. ८) सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे होणाऱ्या निवड चाचणीसाठी रवाना झाला.

४४ व्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी ही चाचणी आयोजित केली आहे. या खेळात रत्नागिरीच्या खेळाडूंनी कठोर सराव करत कंबर कसली आहे. मुराद खलपे यांच्या नेतृत्वाखाली संघ विजयध्वज फडकावण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. रत्नागिरी जिल्हा निवडक संघात शारीक खलपे, जियान मेमन, ओंकार शिंदे, निशांत भोजने, आदित्य कांबळे, अजय वास्कर, अफरोज आलेकर यांचा समावेश आहे. जिल्हा संघनिवडीसाठी सलीम मेमन व क्लबमधील खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 10-01-2026