चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित अभिनय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत २०हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
एकपात्री अभिनय स्पर्धेत रश्मी मोरे, तर द्विपात्री अभिनय स्पर्धेत रंजना सावंत व रश्मी मोरे या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कडवई येथील सिने नाट्य कलाकार डॉ. भगवान नारकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप आंब्रे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे उद्घाटन परीक्षक, नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष योगेश बांडागळे, नगरसेविका अंजली कदम व अभिनय स्पर्धेच्या प्रमुख अॅड. विभावरी रजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन संगीता जोशी यांनी केले. एकपात्री गटात रश्मी मोरे प्रथम, पुष्पावती पाटील द्वितीय, अनिल सोमण तृतीय ठरले. संगीता पालकर व शोभा वाडकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
द्विपात्री गटात रंजना सावंत व रश्मी मोरे प्रथम, सुनीत्र आपटे व संजय शिंदे द्वितीय, अभय दांडेकर व भालचंद्र कदम तृतीय ठरले. स्नेहल दीक्षित व मेघना चितळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. नेत्रा आपटे यांना परीक्षक डॉ. भगवान नारकर यांच्या हस्ते विशेष अभिनय पारितोषिक प्रदान करण्यात आले. बक्षीस समारंभाला नगरसेवक कपिल शिर्के, नगरसेविका रसिका देवळेकर, नगरसेवक निहार कोवळे, परीक्षक डॉ. भगवान नारकर, अभिनय स्पर्धेच्या प्रमुख अॅड. विभावरी रजपूत आणि नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष योगेश बांडागळे उपस्थित होते. सूत्रसंचालन मनीषा दामले, तर आभार प्रदर्शन सचिव डॉ. मीनल ओक यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकांत पाठक, योगेश कुष्टे, छाया पोटे, प्राची गोखले यांच्यासह नाट्य परिषदेच्या सर्व संचालक सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 10/Jan/2026














